चेतना व्यसनमुक्ती केंद्राबाबत आमची भुमिका :: मानव समाजाविषयी असणारी उत्तरदायित्वाची जाणीव, सामाजिक बांधिलकीची भावना, अंतरात असणार निर्मळ, निर्व्याज प्रेम आणि समर्पण, त्यागाची भावना असे आहेत, प्रेरणास्रोत आमच्या चेतना व्यसनमुक्ती केंद्राचे. 'यशवंत फाउंडेशन, जळगाव' संचालित हे "चेतना व्यसनमुक्ती केंद्र" असून इथे व्यसनी पीडित रुग्ण बांधवांची सेवा समर्पित भावनेतून केली जात असते. खरेतर हे मनोअध्यात्मिक साधना केंद्र आहे असे म्हणता येईल. इथे आयुर्वेदिक (पंचकर्म), होमिओपॅथी, नॅचरोपॅथी, ऍलोपॅथी आणि संगीत थेरपी हिप्नोथेरपी, फिजिओथेरपी, मडथेरपी या सर्वांच्या मदतीने रुग्णमित्राला व्यसनमुक्त केले जाते. इतकेच नव्हे तर तज्ञ डॉक्टरांकडून समुपदेशन, प्रबोधन केले जाते. मनोविकार तज्ञ, कौन्सेलर, कर्मचारीवर्ग अशांचे पथक सेवेसाठी सदा तत्पर असते. योगा, प्राणायाम, औषधोपचार, मानसोपचार, समुपदेशन, प्रार्थना, सुविचारांची देवाण-घेवाण, रुग्णांशी सुसंवाद अशा माध्यमातून देखील उपचार रुग्ण मित्रांवर केले जातात.

अधिक माहितीसाठी संपर्क :: पोदार शाळेच्या जवळ, NH 6, बांभोरी पूलाच्या अलीकडे, जळगाव.
ई-मेल :: info@chetnavyasanmukti.com
मोबाईल नं :: +91 9561602333, +91 9422776233

मुख्य पान / मनातले प्रश्न

मनातले प्रश्न चेतना व्यसनमुक्ती केंद्र

Frequently Asked Questions (मनातले प्रश्न)


चेतना व्यसनमुक्ती केंद्र कुठे आहे? आजूबाजूचा परिसर कसा आहे?

चेतना व्यसनमुक्ति केंद्र हे जळगाव शहरालगतच बांभोरी गावानजीक गिरणा नदीच्या काठावर 5 एकर परिसरात वसलेले आहे. नदीकाठी असल्याने केंद्राच्या आजूबाजूला अतिशय निसर्गरम्य परिसर आहे. केंद्राच्या अगदी शेजारीच जळगावमधील प्रसिद्ध 'जलाराम बाप्पा मंदिर' असून त्या मंदिरात व लगतच्या परिसरात धार्मिक वातावरण असते.

चेतना व्यसनमुक्ती केंद्रात रूग्णाला प्रवेशीत करावयाचे असल्यास काय करावे लागते?

सर्वप्रथम रूग्णाला विचारणे अतिशय योग्य असते. रूग्णाला व्यसनमुक्त होण्याची मनापासून इच्छा असेल तर तो व्यसनातून खूप लवकर बाहेर येतो. जर असे विचारणे शक्य नसल्यास आमच्या दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधून योग्य पद्धतीचा अवलंब करावा. रुग्ण प्रवेशीत होताना त्याच्यासोबत असणार्‍या नातेवाइकांनी एक फॉर्म भरून देणे आवश्यक असते.

चेतना व्यसनमुक्ती केंद्रात रूग्णाला प्रवेशीत करत असताना रुग्णासोबत कोणत्या वस्तु देणे आवश्यक असते?
रूग्णाला प्रवेशीत करत असताना त्याच्यासोबत एका बॅगेत खालीलप्रमाणे वस्तु द्याव्या -
  1. १. आधार कार्ड झेरॉक्स
  2. २. पासपोर्ट फोटो - २
  3. ३. शर्ट-पॅंटचे २ जोड, नाईट पॅंट व टीशर्टचा एक जोड
  4. ४. आतील कपडे - २ ते ३ जोड
  5. ५. चिवडा व बिस्किट्स
  6. ६. खोबरेल तेल
  7. ७. कंगवा
  8. ८. सोलापुरी चादर - १
  9. ९. टॉवेल - १
  10. १०. आंघोळीचा साबण
  11. ११. कपड्यांचा साबण
  12. १२. टुथब्रश व टुथपेस्ट
  13. १३. वाचवायची पुस्तके
  14. १४. सुरू असलेली औषधे (असल्यास)
चेतना व्यसनमुक्ती केंद्रात रुग्णाची दिनचर्या काय असते?
वेळ दिनचर्या
उठणे (गुड मॉर्निंग)
स. ०६:०० ते ०७:०० स्वच्छता आंघोळ (तयारी करणे)
स. ०७:०० ते ०७:३० चहा
स. ०७:३० ते ०९:०० प्राणायाम, प्रार्थना, ध्यान
स. ०९:०० ते ०९:३० नाश्ता
स. ०९:३० ते ११:०० मेडिकल चेकअप
स. ११:०० ते दु. १२:०० व्यक्तिमत्व विकाससाठी  व्याख्यान
दु. १२:०० ते १२:३० चर्चासत्र (प्रश्नोत्तरे)
दु. १२:३० ते ०१:३० सात्विक जेवण
दु. ०१:३० ते ०३:३० विश्रांती
दु. ०३:३० ते ०४:०० चहा
दु. ०४:०० ते सं. ०५:०० ग्रुप थेरपी (भावनांचे व्यवस्थापन)
सं. ०५:०० ते ०६:०० शारीरिक शिक्षण (खेळ)
सं. ०६:०० ते ०७:३० कौन्सिलिंग (सकारात्मक विचारांसाठी)
सं. ०७:३० ते रा. ०८:०० सांज भजन
रा. ०८:०० ते ०९:०० रात्रीचे जेवण
रा. ०९:०० ते १०:०० अनुभव, गप्पा व भविष्यवेध (Planning)
रा. १०:०० ते स. ०६:०० रात्रीची गाढ झोप

क्षणचित्रे